अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार, 25 मे 2021, स.11.25
● सध्याचा वास्तविक रेट 27 टक्के ● पॉझिटिव्हिटी रेट 18.60 ● 10,228 जणांची अँटीजन टेस्ट ● 2,279 जणांची rt-pcr टेस्ट ● आतापर्यंत सात लाख नमुने तपासणी ● लॉकडाऊन पाळणे सर्वांची जबाबदारी ● सहकार्य करा : जिल्हाधिकारी शेखर सिंह ● पेट्रोल फक्त अत्यावश्यक सेवांना ● डिझेल मालवाहतूक व शेती कामांना ● सार्वजनिक खाजगी वाहतूक बंदच ● अत्यावश्यक कारण असेल तरच बाहेर पडा
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोना वाढता संसर्ग थांबत नसल्याने अखेर प्रशासनाने सोमवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन सुरू केला आहे. असे असतानाच मंगळवारी आलेल्या अहवालात 2364 जणांचा अहवाल बाधित आला असून वाढीचा वेग कायम आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 27% एवढ्यावर असून निगेटिव्ह अहवालांचा पेंडिंग डाटा भरण्यात आल्याने तो प्रत्यक्ष अहवालात कमी दिसत आहे. मात्र त्यावर न जाता आता बाधित वाढ रोखून जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी जिल्हावासियांनी कडक लॉकडाऊन पाळावा व स्वतःसह प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
पॉझिटिव्हिटी रेट खाली, पण काळजी घ्या
एप्रिलमध्ये जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 37 टक्के एवढा होता. त्यानंतर तो मे महिन्यात 34 टक्केवर आलेला आहे. सध्या तो 27 टक्के असून पॉझिटिव्हिटी रेट खाली घसरत असला तरी बाधित वाढ कायम आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात ज्या संसर्ग साखळ्या निर्माण झालेले आहेत ते त्या तोडणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, असेही आवाहन शेखर सिह यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील लोकांनी काळजी घ्यावी
शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी देखील काळजी घेण्याची गरज अधिक आहे. मास्क, वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक आंतर याबाबी काटेकोरपणे पाळाव्यात. त्यासाठी प्रत्येक गावात सरपंच, पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांनी एक जून पर्यंत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. शहरी भागातील सर्व नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या भागात नियमांचे पालन होण्यासाठी सतर्क रहावे. पोलीस दलाकडून ही लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी काही उपाययोजना व निर्बंध जारी करण्यात आलेले आहेत, असेही शेखर सिंह यांनी सांगितले आहे.
सोमवारी अहवालात 2,364 बाधित
सोमवारी रात्री आलेल्या अहवालानुसार 2364 जणांचा अहवाल बाधित आलेला असून यामध्ये 10, 228 जणांची टेस्ट करण्यात आली असून पैकी 1,786 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. तर 2,279 जणांची rt-pcr टेस्ट करण्यात आले असून त्यापैकी 578 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. Rt-pcr टेस्ट चा पॉझिटिव्हिटी रेट 25.36 एवढा आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 6,99,244 एकूण बाधित 1,51,387 एकूण कोरोनामुक्त 1,28,773 मृत्यू 3456 उपचारार्थ रुग्ण 19,146
सोमवारी जिल्हय़ात बाधित 2,648, मुक्त 2,142, बळी 31