अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 25 जानेवारी 2022, दुपारी 12.00
● आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या जास्त
● लसीकरणाचा वेग वाढला
● सगळ्यात कमी महाबळेश्वर तालुक्यात बाधित
● मृत्युदर शून्याच्या खाली
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील बाधित वाढ मंगळवारी सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार काहीशी कमी झाली आहे. बाधित वाढ कमी होऊन जिल्हा कोरोनामुक्त कसा होईल यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मंगळवारी नव्याने 921 जण बाधित आढळून आले आहेत. सगळ्यात कमी महाबळेश्वर तालुक्यातील बाधित संख्या आहेत. मृत्युदर रोखला गेला आहे.
बाधित वाढ होऊ लागली कमी
जिल्ह्यातील कोरोना बाधित वाढ ही वाढत चालली होती. ती बाधित वाढ काहीशी कमी आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले गेल्याने मंगळवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात 921 जण बाधित आढळून आले आहेत. सोमवारी दिवसभरात 3523 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले असून पॉझिटिव्हीटी रेट 26.14वर पोहचला आहे.
सगळ्यात कमी महाबळेश्वरमध्ये बाधित
गुलाबी थंडीत महाबळेश्वरमध्ये सर्व वातावरण गारठेलेले आहे. शासनाच्या नियमानुसार पर्यटकांची संख्या तुरळक झालेली असून जिल्ह्यातील सगळ्यात नव्याने कमी बाधित महाबळेश्वर तालुक्यातील आढळून आले आहेत. केवळ 3 जण बाधित आढळून आले आहेत.
मंगळवारी
नमुने-3523
बाधित-921
मंगळवारपर्यंत
नमुने-2471186
बाधित-270565
मृत्यू-3539
मुक्त-252433