अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 1 फेब्रुवारी 2022, सकाळी 11.00
● थंड हवेच्या महाबळेश्वर तालुक्यात नव्याने केवळ 1 बाधित
● सातारा तालुक्यातील 89 जण बाधित
● फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला दिलासा
● जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाकडे लक्ष
सातारा / प्रतिनिधी :
जानेवारी महिन्यात बाधित संख्या वाढत होती. त्याच प्रमाणात रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्यांपेक्षा घरच्या घरी उपचार करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला जशी बाधित वाढ राहिली होती, ती आता घटू लागली आहे. मंगळवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात जिल्ह्यातील 315 जण नव्याने बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील 2293 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले होते. त्यामुळे पॉझिटिव्हीटी 13.74 वर पोहचली आहे.
महाबळेश्वर तालुक्यात सर्वात कमी बाधित
जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील बाधित वाढ ही सगळ्यात जास्त आतापर्यंत राहिली आहे. त्यापाठोपाठ कराड तालुका राहिला आहे. मात्र सर्वात कमी बाधित आढळून आले ते महाबळेश्वर तालुक्यात. महाबळेश्वर तालुक्यात पर्यटनस्थळ असल्याने येणाऱ्या पर्यटकांची काळजी घेतली जाते. त्यामुळे आतापर्यंत बाधित वाढ रोखली गेली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील नव्याने बाधित आढळून येणाऱ्यांमध्ये 1 जणांचा समावेश आहे. जावली 10, कराड 52, खंडाळा 8, खटाव 23, कोरेगाव 20, माण 25, पाटण 8, फलटण 62, सातारा 89, वाई 13, इतर 4 असे एकूण 315 बाधित आढळून आले.
जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाकडे लक्ष
राज्य सरकारने काल निर्बंधामध्ये शिथिलता आणलेली आहे. रुग्ण वाढ कमी झाल्याने सरकारने निर्णय घेतला गेला आहे. सातारा जिल्ह्यातील बाधित वाढ ही कमी होऊ लागली असून जिल्हाधिकारी नव्याने कधी आदेश काढतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.
मंगळवारी
नमुने-2293
बाधित-315
मंगळवारपर्यंत
नमुने-25,02,236
बाधित-2,76,362
मृत्यू-6,574
मुक्त-2,59,806