प्रतिनिधी /बेळगाव
बापट गल्ली सांप्रदाय भजनी मंडळाच्यावतीने मंगळवार दि. 23 रोजी संध्याकाळी 6 वाजता कार्तिक दीपोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल बेनके, मल्लाप्पा यादवाड, नगरसेवक सौदत्ती, शिल्पा केकरे, अशोक पोतदार, राजेंद्र गायकवाड, नागनाथ स्वामी उपस्थित होते. यावेळी उंडाळे महाराज यांनी दीपोत्सव व काकड आरती यावर प्रवचन दिले.
सांप्रदाय भजनी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत सांबरेकर यांनी मंडळाच्या वर्षभरातील कार्याची माहिती दिली आणि काकड आरतीचे महत्त्व सांगितले. प्रमुख पाहुणे आमदार अनिल बेनके यांनी मंडळाच्या कार्याचा गौरव करून शहर भागात हा धार्मिक कार्यक्रम उत्साहाने साजरा केला जातो. यासाठी विणेकरी आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या. याठिकाणी नियमित सकाळी 6 वाजता 40 दिवस काकड आरती होत असते आणि आपण स्वतः या ठिकाणी दीपोत्सवला आवर्जून उपस्थित असतो, असे सांगून मंडळाच्या धार्मिक कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी विणेकरी गणपूमामा चौगुले तसेच रामचंद्र निकम यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गल्लीतील व मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळराव केसरकर, वसंत शिंदे, अनिल बिर्जे, शिवराम गवाने, अरुण पोटे, दिलीप पोटे, मधुकर कणबरकर, रजपूत, कनकणमेली, किल्लेकर, रंगरेज, महादेव चौगले, अजित कोरे, केळकर, भुते, मारुती केसरकर, अनंत कोरे यांना पुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते रामा जाधव, राजू पवार, लोकनाथ रजपूत, रोहन मिसाळ, उदय पाटील, रामा पाटील, पांडुरंग पाटील, प्रभाकर कणबर्गी, विजय भोजगार, सतीश गवाने, कार्यकर्ते, महिला व बालगोपाल उपस्थित होते. यावेळी मंदिर परिसरात महिलांनी सुरेख रांगोळी रेखाटून कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पावले यांनी केले. रविवार दि. 28 रोजी सकाळी दहीकाला, आरती, पालखी प्रदक्षिणेनंतर आवळी भोजन (महाप्रसाद) होऊन सांगता होणार आहे.