ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
भारत-पाकमधील संघर्ष साऱ्या जगाला माहीत आहेत. सीमेवर पाक सैन्याने आणि दहशतवाद्यांनी हजारो जवान मारले असतानाही नरेंद्र मोदी पाकसोबत व्हॅक्सीन डीप्लोमसी करत त्यांना 4.5 कोटी लसीचे डोस देणार आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या महामारीत सुद्धा “बाप बाप होता हैं और बेटा बेटा होता हैं” हे जगाला दिसून आले.
पाकिस्तानला ‘गावी’ कराराच्या अंतर्गत भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेल्या ‘कोविशिल्ड’लसीचे 4.5 कोटी डोस देण्यात येणार आहेत. पाकिस्तानचे राष्ट्रीय आरोग्य सेवेचे सचिव आमिर अशरफ ख्वाजा यांनी तेथील स्थानिक मीडियाला यासंदर्भात माहिती दिली आहे.
ख्वाजा म्हणाले, विकसनशील आणि गरीब देशांना ‘गावी’ कराराअंतर्गत लस पुरवठा केला जातो. पाकिस्तानलाही याच कराराअंतर्गत भारताकडून 4.5 कोटी लसीचे डोस मिळणार आहेत. यामधील 1.6 कोटी डोस हे जून महिन्यापर्यंत उपलब्ध होतील. कोरोनाशी लढण्यासाठी पाकिस्तान हर्ड इम्युनिटी आणि चीन व कोवॅक्सकडून मदत म्हणून मिळणाऱ्या लसीवर अवलंबून आहे.
पाकिस्तानला यापूर्वी चीनकडून लसीचा पुरवठा झाला होता. त्यानुसार 27.5 दशलक्ष लोकांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि जेष्ठांचा समावेश होता.