आर्थिक मदतीचे आवाहन
प्रतिनिधी /म्हापसा
खोब्रावाडा कळंगूट येथील श्री देव बाबरेश्वर देवस्थान ट्रस्टचे नव्याने बांधण्यात येणाऱया देवस्थानचे काम 80 टक्के पूर्णत्वाकडे आले आहे. येत्या जत्रोत्सवापूर्वी हे मंदिर पूर्णत्वाकडे नेण्याचा निर्धार देवस्थान समितीने केला असून हे मंदिर उभारण्यासाठी भाविकांनी आर्थिक पाठबळ द्यावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत (चानू) चोडणकर यांनी केले आहे.
श्री देव बाबरेश्वरची जत्रा तमाम गोमंतकामध्ये केळय़ाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. देवाशी साकडे घालून आपण केलेला नवस पोचविण्यासाठी व काम झाल्यावर देवाचा मान देण्यासाठी या मंदिरात भाविक केळय़ाचे घड देतात व ते मंदिराच्या वर झाडाला एकत्रित बांधले जातात. अशी प्रथा आहे. याबाबत अधिक माहिती देताना अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर म्हणाले की, सहा महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येईल असे कंत्राटदाराने सांगितले असून दिवसरात्र येथे मंदिर उभारण्यासाठी काम जोरात सुरू आहे.
तामिळनाडूहून येथे खास दगड आणण्यात आले असून दगडावर नक्शीकाम झाल्यावर ते क्रेनच्या सहाय्याने एकावर एक ठेवले जातात व या मंदिराची नव्याने उभारणी केली जात आहे. ऑगस्टच्या 11 रोजी देवाची तत्वे उतरून 19 रोजी भूमीपूजन तर 28 ऑगस्ट रोजी या मंदिराची पायाभरणी करण्यात आल्याची माहिती श्री. चोडणकर यांनी दिली. सप्टेंबरच्या 1 तारीखपासून या कामाला सुरुवात झाली असून तांबडीसुर्लाच्या धर्तरीवर खास तामिळनाडूहून आणण्यात आलेल्या विशेष दगडानी या मंदिराची उभारणी सुरू आहे. अशी माहिती चोडणकर यांनी दिली.
हाकेला पावणारा या मंदिरासाठी जागृत देवस्थानसाठी सुमारे साडेतीन कोटी खर्च अपेक्षित आहे. देवस्थानकडे अर्धे पैसे आहेत. अनेकजण आर्थिक मदत करण्यास पुढे आले आहे. मंदिर त्वरित उभारण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱयातून देवळास आर्थिक मदत करावी असे आवाहन चोडणकर यांनी केले आहे. खास नंबर 1 पाशाणी दगडाने हे मंदिर उभारण्यात येत आहे. 21 फेब्रुवारी 2022 ला या देवस्थानचा जत्रोत्सव असून देव बाबरेश्वर व देवी शांतादुर्गा हे मंदिर जत्रोत्सवापूर्वी सर्वांच्या मदतीने बांधून घेणार आहे अशी माहिती यावेळी चोडणकर यांनी दिली.