प्रतिनिधी /म्हापसा
श्री देव बाबरेश्वर देवस्थान ट्रस्ट व कळंगूट पंचायतीच्या सहकार्याने 58 वा देवाचा जत्रोत्सव यंदाही वर्ष पद्धतीप्रमाणे प्लास्टिक मुक्त जत्रा करण्याचा निर्णय घेतला आहे. या जत्रेला येणाऱया भाविकांना तसेच येथे केळी आदी सामान विकणाऱयांना व ग्राहकांना देवस्थानच्या वतीने सर्वांना कपडय़ाच्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले. जेणेकरून यंदाची जत्रा प्लास्टिक मुक्त होण्यास हातभार लाभेल. मान्यवरांच्याहस्ते सरपंच शॉन मार्टीन्स व देवस्थान अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर आदी पदाधिकाऱयांच्याहस्ते येथे केळी विक्रेते व इतरांना कपडय़ाच्या पिशव्या वाटप करण्यात आल्या.
ग्रीन गोवा प्लास्टिक मुक्त जत्रा करण्याकडे भर
एकनाथ नागवेकर म्हणाले की, सरकारच्या आदेशानुसार ग्रीन गोवा, कचरा मुक्त गोवा यांच्या पालनाकडे लक्ष देऊन कळंगूट बाबरेश्वर देवस्थान ट्रस्ट यंदाही 58 व्या जत्रोत्सवात कचरा मुक्त जत्रा करण्यासाठी भर देणार आहे. ग्रीन कळंगूट राखण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले व ही जत्रा प्लास्टिक मुक्त होईल असे त्यांनी सांगितले.
सर्वांच्या आशीर्वादाने मे अखेर मंदिर पूर्ण होईल- चानू चोडणकर
कळंगूट बाबरेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत (चानू) चोडणकर म्हणाले की, बाबरेश्वर देवस्थान म्हणजे येथे लोक येऊन देवाकडे मागणे व गाऱहाणे घालतात व देवाजवळ मागणी करतात तो त्यांचे म्हणणे ऐकून नवसाला पावतो अशी देवाची ख्याती आहे व त्याची कामे होतात. बनाना फेस्टीवल म्हणून ही जत्रा प्रसिद्ध आहे. येथे सर्वांच्या आशीर्वादाने भव्य दिव्य मंदिर उभारीत आहे ते येत्या मे अखेर पूर्ण होणार आहे. ही जत्रा प्लास्टिक मुक्त जत्रा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत असे ते म्हणाले.
देवस्थान समिती अभिनंदनास पात्र – शॉन मार्टीन्स
कळंगूट गावचे सरपंच शॉन मार्टीन्स म्हणाले की, देवस्थानचे अध्यक्ष चानू चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे काम हाती घेतले आहे ते पूर्णत्वाकडे येईल.ते अभिनंदनास पात्र आहे. 30 टक्के काम बाकी आहे ते येत्या 3 महिन्यात पूर्ण होईल. हे मंदिर कळंगुटमध्येच नव्हे तर संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे. काळय़ा दगडाने हे मंदिर उभारण्यात येत आहे. येथे सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. देवस्थानने शौचालय बांधले आहे. येथील मंदिर परिसर स्वच्छ ठेवावा व ही जत्रा प्लास्टिक मुक्त करावी असे ते म्हणाले.