प्रतिनिधी /बेळगाव
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत, स्वातंत्र्याची पहिली पहाट पाहिलेले. विद्या वाचनालय अनगोळचे अध्यक्ष व ज्ये÷ नागरिक बाबुराव शिंदोळकर यांचा शाल, भेटवस्तू, सन्मान पत्र देऊन काकडे फौंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.
सोमवारी हा कार्यक्रम अनगोळ येथे पार पडला. संत कनकदास जयंतीचे औचित्य साधून यावेळी किशोर काकडे यांनी कनकदासांची कथा, जगप्रसिद्ध उडुपी मंदिरातील कनक-खिडकीची कथा सांगितली. प्रारंभी भारत माता पूजन करण्यात आले. बाबुराव शिंदोळकर यांनी स्वागत-परिचय तर उपाध्यक्ष सुरेश खर्डे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तनुजा दड्डीकर होत्या. यावेळी प्रा. सविता धामणेकर, सदानंद गौंडाडकर यांनी ही मनोगत मांडले. यावेळी गायत्री सोमण, सुश्री, श्रद्धा पाणारी, विशाल बेर्डे, प्रशांत पाणारी, वाय. एच. बांडगी, महादेव शहापूरकर व इतरांनी विशेष परिश्रम घेतले. ‘बलसागर भारत होवो’ या गाण्यानी सांगता झाली.