टींकर सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना घर, शाळासह चालती फिरती कोडिंग सेवा देणार
वृत्तसंस्था/ बेगळूर
बायजूसने अमेरिकेमध्ये आपली उपस्थिती मजबूत करण्याची धडपड चालवली असून अमेरिकेतील के-12 क्रिएटिव्ह कोडिंग प्लॅटफॉर्म टींकरची (Tynker) खरेदी केली आहे. हा व्यवहार 25 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 1,500 कोटी रुपयांना झाला आहे. टींकर सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना घर, शाळा तसेच चालते फिरते कोडिंग शिकण्यास सुविधा उपलब्ध करुन देत आहे. टींकर कोडिंग पाठय़पुस्तकाचा वापर युएसच्या आठ शाळांपैकी एकमध्ये केला जात असून जागतिक पातळीवर 1 लाखावर शाळा आणि 150 देशांमध्ये 6 कोटीपेक्षा अधिक मुलांना यांचे शिक्षण दिले जात असल्याची माहिती आहे.
बायजूसने युएस डिजिटल रीडिंग प्लॅटफॉर्म एपिकचे अधिग्रहण केले आहे. हा व्यवहार साधारणपणे 50 कोटी डॉलरपेक्षा अधिक आहे. 13 वर्षापेक्षा कमी वय असणाऱया मुलांवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठीचा एपिक हा प्लॅटफॉर्म असल्याचे सांगितले आहे. बायजूसची योजना उत्तर अमेरिकेत 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची आहे.
बायजूसकडून वर्षभरातीलकंपन्यांची खरेदी
बायजूसने मागील वर्षभरात अनेक अधिग्रहणे केली आहेत. यामध्ये व्हाइटहॅट ज्युनिअरची 30 कोटी डॉलरमध्ये खरेदी आणि आकाश एज्युकेशन सर्व्हिसेसची जवळपास 1 अब्ज डॉलरमध्ये खरेदीचा समावेश आहे. बायजूसने दोन वर्षांपूर्वी शैक्षणिक खेळांचे निर्माते युएसमधील ओस्मोचे अधिग्रहण केले होते.