वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानावर आधारीत कार्यरत असणारी कंपनी बायजू देशातील 200 शहरांमध्ये जवळपास 500 शिक्षण केंद्रे स्थापन करणार असून याकरीता जवळपास 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
या अगोदर एक पायलट प्रकल्प सुरु केला असून याअंतर्गत 80 शिक्षण केंद्रांमध्ये कंपनीकडून 4 ते 10 पर्यंतच्या मुलांसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून शिक्षण देण्याची सेवा सुरु करण्यात येणार आहे.
शिक्षण केंद्रांची सुरुवात ऐतिहासिक
बायजूच्या शिक्षण केंद्रांची सुरुवात कंपनीसाठी ऐतिहासिक क्षण राहणार असून येत्या 12 ते 18 महिन्यांच्या कालावधीत भारतामध्ये या केंद्रांची उभारणी करण्यात येणार असून आमची टीम मजबूत करण्याचा विचार असल्याचे बायजूचे सीओओ मृणाल मोहित यांनी म्हटले आहे.