नव्या अमेरिकेचा प्रारंभ केल्याचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
कोरोनाग्रस्त भूतकाळाच्या कटू आठवणी मागे सारून अमेरिकेच्या प्रगतीचा नव्याने प्रारंभ आपल्या प्रशासनाने केला आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांनी केले आहे. गुरुवारी त्यांच्या प्रशासनाला शंभर दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्त त्यांनी अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी गृहांमध्ये जाऊन सदस्यांची भेट घेतली. राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या सहकार्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे आर्थिक पॅकेज अमेरिकेने बायडन प्रशासन सत्ताधीश झाल्यानंतर घोषित केले होते. ते 4 लाख कोटी डॉलर्सचे होते. या रकमेचा उपयोग नव्या अमेरिकेच्या बांधणीसाठी केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. आपल्या प्रशासनाला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी सर्वात कमी मताधिक्मय मिळालेल्या राज्याला भेट दिली. इतिहासातील सर्वात भव्य पॅकेजचा उपयोग कोरोनाग्रस्त लोकांच्या पुनउ&भारणीला आधार देणे, आरोग्य व्यवस्था शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचविणे तसेच औद्योगिक उत्पादनाची गती वाढविण्यासाठी गुंतवणूक करणे इत्यादी कामांकरिता उपयोगात आणले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या पॅकेजची रूपरेषा सध्या चर्चेचा विषय बनली असून रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी त्यावर टीका केली आहे. एवढा खर्च भरून काढण्यासाठी प्रशासनाला करवाढ करावी लागेल. तशी केल्यास औद्योगिक प्रगतीला अडसर निर्माण होईल, अशी शक्मयताही काही रिपब्लिकन नेत्यांनी बोलून दाखविली आहे.