ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन 279 इलेक्ट्रोल मतांनी विजयी झाले आहेत. मात्र, मतमोजणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. उर्वरित राज्यातील मतमोजणीची प्रक्रिया 8 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर 20 जानेवारीला बायडेन यांचा शपथविधी होणार आहे.
मतमोजणी प्रक्रियेला कायदेशीर आव्हान देण्यात आले असल्याने 538 इलेक्ट्रोल कॉलेजचे निकाल तयार केले जाणार आहेत. त्यानंतर ते अधिकृत रित्या अमेरिकेच्या काँग्रेसकडे सोपवले जातील. 6 जानेवारीला अमेरिकेच्या काँग्रेसचे अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. त्यावेळी विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स अधिकृतपणे निवडणुकीचे निकालांची घोषणा करतील.
राष्ट्राध्यक्ष पदासाठी 3 नोव्हेंबरला निवडणूक झाली. विजयासाठी उमेदवाराला 270 इलेक्ट्रोल वोटची गरज होती. बायडेन यांना आतापर्यंत 290 तर ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रोल वोट मिळाले आहेत.