ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सर्जन जनरलपदी भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर विवेक मूर्ती यांची संसदेत बहुमताने निवड करण्यात आली. 57 खासदारांनी मूर्ती यांच्या बाजूने तर 43 खासदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केले.
मूर्ती हे पब्लिक हेल्थ सर्व्हिस कमिशनच्या कोअरमधील एक फिजीशियन आणि माजी व्हाईस ऍडमिरल आहेत. बायडेन यांचे निकटवर्तीय अशीही त्यांची ओळख असून, त्यांनी बराक ओबामा यांच्या कार्यकाळातही सर्जन जनरल म्हणून काम पाहिले आहे. 2017 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना हटवले होते.
सर्जन जनरलपदी नियुक्ती झाल्यानंतर मूर्ती यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, सर्जन जनरल म्हणून पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. मी देशाला आणि देशातील मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्यास तयार आहे.