ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची निवड केली आहे. देशांतर्गत गुप्तचर विभागाची जबाबदारी त्यांनी ‘सीआयए’च्या माजी संचालक आर्विल हेन्स यांच्यावर सोपवली असून, ही जबाबदारी स्वीकारणाऱ्या त्या पहिल्या महिला असणार आहेत.
अमेरिकेचे मुख्य राजदूत जॉन केरी यांच्याकडे हवामान विभागाची तर ज्येष्ठ वकील अलेजांड्रो मायोर्कस यांच्याकडे अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असणार आहे. दीर्घकाळ परराष्ट्र धोरण सल्लागार म्हणून काम केलेले अँटनी ब्लिंकेन हेपरराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार सांभाळतील.
व्हाईट हाऊस’च्या सुरक्षा सल्लागारपदी जेक सालीवन यांची तर संयुक्त राष्टातील अमेरिकेच्या प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांची निवड करण्यात आली आहे.