प्रतिनिधी /वास्को
वास्कोतील बायणा किनाऱयावर दरवर्षी प्रमाणे यंदाही छट पुजा उत्सव उत्साहात प्रारंभ करण्यात आला. बायणा किनाऱयावर मोठय़ा संख्यने बिहारी बांधव व काही इतर उत्तर भारतीय कुटुंबे या उत्सवात सहभागी झाली होती. त्यामुळे बायणा किनारा यंदाही उत्तर भारतीयांच्या एकत्रीकरणाने फुलून गेला होता. आज गुरूवारी सकाळी सुर्योदयानंतर या उत्सवाची पारंपरीक पध्दतीने सांगता होणार आहे.
उत्तर भारतीय बांधवांतर्फे दरवर्षी बायणा किनाऱयावर संध्याकाळी सुर्यास्तापूर्वी छट पुजा उत्सवाला प्रारंभ करण्यात येतो. दुसऱया दिवशी सकाळी सुर्योदयानंतर या उत्सवाची सांगता होते. सुर्यास्त आणि सुर्योदय अशा दोन्ही वेळी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, उत्तरांचल आदी प्रदेशातील मुरगाव तालुक्यात स्थायिक झालेले लोक कुटुंबीयांसह बायणा किनाऱयावर मोठय़ा संख्येने हजर असतात. यात नौदलामधील कुटुंबांचा अधिक भरणा असतो. यंदाही प्रचंड संख्येने लोक या उत्सवात सहभागी झाले होते. बायणा किनाऱयावर या उत्सवानिमित्त जणू जत्राच भरली होती. नगरविकासमंत्री मिलिंद नाईक व समाजसेवक दाजी साळकर यांनीही या उत्सवात सहभागी होऊन उत्तर भारतीय बांधवांना शुभेच्छा दिल्या.