वृत्तसंस्था/ बर्लीन
जर्मनीच्या बायर्न म्युनिच फुटबॉल संघातील बचावफळी खेळणारा फुटबॉलपटू निकलास सुले याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती क्लबच्या अधिकाऱयाने दिली. सुलेला काही दिवसांसाठी होम आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे.
बायर्न म्युनिच संघातील कोरोनाची बाधा झालेला सुले हा दुसरा फुटबॉलपटू आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये बायर्न म्युनिच संघातील सर्जी गेनाब्रि याला कोरोनाची बाधा झाली होती. 2020 च्या फुटबॉल हंगामात बायर्न म्युनिच संघाने पाच विविध स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामध्ये चॅम्पियन्स लीग, डोमेस्टीक लीग स्पर्धेत दोनवळा जर्मन चषक फुटबॉल स्पर्धा यांचा समावेश आहे. बुदेस्लिगा फुटबॉल स्पर्धेच्या गुणतक्त्यात बायर्न म्युनिच आघाडीवर असून शनिवारी झालेल्या सामन्यात बायर्न म्युजनिचने कोलोनीचा 2-1 असा पराभव केला.