सांखळी/प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयातील सुर्ला गावातील बाये लक्ष्मी नारायण देवस्थान च्या नूतन मंदिर चा तेरावा वर्धापनदिन 25 व 26 रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमानिशी साजरा होणार आहे.
सोमवार दि.25 रोजी सकाळी 8 वा.गणपती पूजन, श्री विष्णुयाग व पुण्याहवाचन, नंतर देवास पवमान, सूक्तभिषेक कुंकुमार्चन, दु. 1 वा.बलिदान व पूर्णाहुती, नंतर महाआरती, तीर्थप्रसाद, ब्राम्हण संतर्पण,1ः30 महाप्रसाद होईल. रात्री 8 वा. ग्रामस्थांतर्फे भजनाचा कार्यक्रम होईल. 10 वा. श्री महालदंडेश्वर नाटय़ मंडळ बाये-सुर्ल तर्फे श्री उल्हास नाईक व गौरेश प्रियोळककर दिग्दर्शीत विनोदी नाटक ” देवा तू पाव रे ” यात कृष्णा भोमकर, शरद भोमकर, मुकेश भोमकर, प्रणित बायेकर, स्वप्नील बायेकर,लोक्मया ओली, महेश आमोणकर, प्राजक्ता बायेकर, तेजा भोमकर या नवोदित युवा नाटय़ कलाकारांचा समावेश आहे.
मंगळवार 26 रोजी.सकाळपासून धार्मिक विधी.श्री लक्ष्मी नारायण देवला अभिषेक व पूजा, सकळी 10 वा. श्री सत्यनारायण महापूजा, नंतर आरती व तिर्थ प्रसाद, दु. 1.30 महाप्रसाद होईल. संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम. रात्री 10 वा. मंडकईकरवाडा बाये येथील युवा कलाकारांतर्फे मिलिंद म्हडगुत लिखित अजय भामईकर दिग्दर्शीत नाटक “पैसे करता पिशे” यात शिवम मडकईकर, साईश मडकईकर, विनय मडकईकर, ब्रिजेश मडई कर, पुंडलिक मडकईकर, तन्मय नाईक, दिया मडकईकर, तन्वी काले कर या नवोदित कलाकारांनी भूमिका साकारली आहे, असे देवस्थान ट्रस्ट आणि कार्यकारी समितीतर्फे कळवण्यात आले आहे.