कंत्राटदार कंपनीचा मडगाव पालिकेकडे पत्रव्यवहार
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेचा पहिला 5 टन क्षमतेचा बायोमिथेनेशन प्रक्रिया लघुप्रकल्प सहा महिन्यांनंतर 30 सप्टेंबर रोजी प्रत्यक्षात येणार होता. मात्र पावसाळा व मध्यंतरी आलेल्या चक्रीवादळामुळे काम खोळंबल्याने प्रकल्प?ाचे काम पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराने आणखी महिन्याभराची मुदत वाढवून देण्यासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती पालिकेच्या तांत्रिक विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
सदर प्रकल्प उभारण्यासाठी मडगाव पालिकेने पाच महिन्यांपूर्वी आदेश जारी केले होते. पुणेस्थित उर्जा बायो सिस्टम प्रा. लि. यांना एसजीपीडीए मार्केटजवळ एक लघुप्रकल्प स्थापित करण्याचे कंत्राट देण्यात ?आले होते. सदर कंपनीच्या 2.40 कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली होती. दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाचा (एसजीपीडीए) मासळी बाजार येथे हा प्रकल्प उभारला जात आहे. 180 दिवसांत प्रकल्प स्थापित करून कार्यान्वित करण्याचे दिलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले होते.
मात्र पावसाळय़ात अडथळे आल्याने काम करणे शक्मय झाले नसल्याचे सदर कंपनीने पालिकेला पत्र पाठवून कळविले आहे. एका महिन्याची मुदतवाढ देण्याची विनंती त्यांनी पालिकेला केली आहे. त्यावर कनि÷ तसेच साहाय्यक अभियंत्यांनी सदर मुदतवाढ देण्याची शिफारस करणारा शेरा टाकला असता पालिका अभियंता दिनिज डिमेलो यांनी 22 रोजी सदर प्रकल्पाच्या कामाचे सर्वेक्षण करण्याचे ठरविले. मात्र अभियंता अन्य कामात व्यस्त राहिल्याने सदर सर्वेक्षण होऊ शकले नाही. त्यामुळे अधिकृतरीत्या अजूनही कंत्राटदार कंपनीला मुदतवाढ देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.
बायोमिथेनेशन प्रकल्प पहिल्यांदाच उभारला जात असल्याने ही पद्धत येथील कचऱयाची विल्हेवाट लावून कशा प्रकारे निकाल देते हे पडताळून पाहण्यासाठी सुरुवातीस प्रायोगिक तत्त्वावर म्हणून हा एकच प्रकल्प उभारण्याचे ठरविण्यात आले होते. पालिकेने निविदा मागविल्या असता उर्जा लि. व सुश्री ऍटॉम पॉवर प्रायव्हेट लिमिटेड अशा दोन कंपन्यांनी प्रकल्प स्थापित करण्यास पात्रता दर्शविली होती. पालिकेने त्यातून पुणेच्या उर्जा कंपनीची निवड केली होती. सध्या उभारण्यात येणाऱया प्रकल्पाची किंमत 2.40 कोटी रु. असून जी-सुडामार्फत प्रकल्प किंमत ठरविण्यात आली आहे.