वार्ताहर / बारामती :
बारामतीत वैद्यकिय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयास नुकतीच प्रशासकिय मान्यता देण्यात आली आहे. सन 2022-2023 म्हणजेच पुढील वर्षापासून हे महाविद्यालय सुरू होणार आहे.
बारामतीत यापूर्वी वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयासही परवानगी देण्यात आली असून, तेथे शंभर विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यासाठी 100 खाटांचे अद्ययावत रूग्णालयही नुकतेच सुरू झाले आहे. तर नव्याने सुरू होणाऱ्या 100 विद्यार्थी क्षमतेच्या शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित 100 बेडच्या शासकिय आयुर्वेदिक रूग्णालयासाठी 394 पदे निर्माण करण्यास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने नुकतीच प्रशासकिय मान्यता दिली असून तसा आदेश ही जारी करण्यात आला आहे. सन 2022 -2023 पासून हे महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये 230 पदे नियमित स्वरूपात निर्मित करण्यात आली असून 164 पदांची सेवा बाह्ययंञणेव्दारे घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या अध्यादेशानुसार प्रथम, व्दितीय, तृतीय, व अंतिम टप्प्यातील पदे टप्पानिहाय मंजुर होणार असून प्रतिवर्षी पुढील टप्प्यातील पदे निर्माण होणार आहेत. यामध्ये एक अधिष्ठाता, 14 प्राध्यापक, 14 सहयोगी प्राध्यापक, 17 सहाय्यक प्राध्या पक, एक प्रशासकिय अधिकारी व इतर कार्यालयीन कामकाजासाठी 57 अशी एकुण 104 पदे निर्माण करण्यात आली आहेत. याशिवाय रूग्णालयासाठी 126 नियमित पदांची निर्मिती करण्यात आली आहे. यात महाविद्यालयाच्या पहिल्या टप्प्यासाठी 58 नियमित पदे असून 39 पदे बाह्ययंत्रणेव्दारे भरती केले जातील.