बारामुल्ला/प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी बारामुल्ला येथील उरी येथे १० दहशतवाद्यांना अटक केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला.
दरम्यान, उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून ४ पिस्तुल, १० ग्रेनेड, २१ लाख रुपये रोख, ४ वाहने व ९ किलो हेरॉईन (बाजार मूल्य ४५कोटी रुपये) जप्त केले.
दरम्यान जम्मू-काश्मीर पोलिसांनी उरी, बारामुल्ला येथे १० दहशतवाद्यांना अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्रे व दारूगोळा जप्त केला आहे अशी माहिती एसएसपी बारामुल्ला रईस मोहम्मद भट यांनी दिली. तसेच त्यांनी आम्ही आतापर्यंत १० लोकांना अटक केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.