ऑनलाईन टीम / श्रीनगर :
उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील कलंत्रा क्रेरी गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळली आहे. त्यानुसार आज सकाळी सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
आरआर, एसओजी आणि सीआरपीएफकडून संयुक्तपणे हे सर्च ऑपरेशन राबविले जात असून, जवानांनी कलंत्रा क्रेरी गावाला घेराव घातला आहे. गावाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून, गावातील प्रत्येक घराची झडती घेण्यात येत आहे.