ऑनलाईन टीम / पुणे :
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या प्रवेश पत्राबाबत गुरुवारी बोर्डाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे.
त्यानुसार 23 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या 12 वी बोर्डाचे परीक्षेचे हॉल तिकीट येत्या 3 एप्रिलपासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
विद्यार्थी हे हॉल तिकीट डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना प्रवेश पत्राची ऑनलाईन प्रिंट काढून द्यायची आहे.
विद्यार्थ्यांनी या प्रिंट आउटवर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का घ्यावी. हॉल तिकीटमध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्याच्या दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत. त्याचप्रमाणे हॉल तिकीट वरील फोटो स्वाक्षरी विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे.
तसेच एखाद्या विद्यार्थ्याकडून हॉल तिकीट गहाळ झाल्यास त्याला पुनश्च प्रिंटआउट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन हॉल तिकीट द्यायचे आहे.
फोटो सदस्य असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिटकून संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी त्यावर शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. जेणेकरून, परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना हॉल तिकीट संदर्भात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.