बांदा/ प्रतिनिधी-
दी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.महाविद्यालयातून 349 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.यात विज्ञान शाखेतील कु.एकता महादेवं सावंतमोर्ये हिने 98.50 टक्के गुण घेत प्रथम क्रमाक तर अकॉउंट ऑफिस मॅनेजमेंट मधील कु. रत्नप्रभा एकनाथ केळूसकर हिने 92.33 टक्के घेत दृतीय व विज्ञान शाखेतील कु.देवांशु योगेश परुळेकर याने 91.67 टक्के घेत महाविद्यालयात तृतीय क्रमाक पटकाविला.यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था , पालक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.