परीक्षेचे अंतिम वेळापत्रक शिक्षण खात्याकडून प्रसिद्ध
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष विलंबाने सुरू झाले आहे. शिवाय शाळा-पदवीपूर्व महाविद्यालये उशिरा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या अनुकूलतेसाठी यंदा परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. शिक्षण खात्याने शुक्रवारी बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार 24 ते मे 16 जून या कालावधीत परीक्षा होणार आहे.
शिक्षण खात्याने 29 जानेवारी रोजी बारावी परीक्षेचे तात्कालिक वेळापत्रक प्रसिद्ध करून आक्षेप आणि सल्ले मागविले होते. त्यासाठी आठवडाभराची मुदत दिली होती. आक्षेपांचा विचार केल्यानंतर शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी स्वतः विविध शाळा-महाविद्यालयांना भेटी दिल्या होत्या. यावेळी त्यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची मते जाणून घेतली होती. नीट, जेईई यासारख्या स्पर्धा परीक्षांचा विचार करून परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्याची विनंती विद्यार्थी आणि पालकांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार शिक्षण खात्याने शुक्रवारी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
परीक्षेचे वेळापत्रक असे….
24 मे इतिहास
25 मे कर्नाटक संगीत/हिंदुस्थानी संगीत
26 मे भूगोल
27 मानसशास्त्र, सामान्य गणित
28 मेतर्कशास्त्र
29 मे हिंदी
31 इंग्रजी
1 जून माहिती तंत्रज्ञान, हेल्थ केअर
2 जून राज्यशास्त्र, संगणक विज्ञान
3 जून जीवशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स
4 अर्थशास्त्र
5 जून गृहविज्ञान
7 जून व्यवहार अध्ययन, भौतिकशास्त्र
8 जून ऐच्छिक कन्नड
9 जून मराठी, तामिळ, मल्याळी, तेलगू
10 जून समाजशास्त्र, रसायनशास्त्र
11 जून उर्दु, संस्कृत
12 जून संख्याशास्त्र
14 जून लेखाशास्त्र, गणित, शिक्षण
15 जून भूगर्भशास्त्र
16 जून कन्नड