वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियाची महिला टेनिसपटू ऍश्ले बार्टी ही सध्या महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत अग्रस्थानावर आहे. 2020 च्या टेनिस हंगामाअखेर बार्टी आपले अग्रस्थान शाबूत ठेवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोरोना महामारी समस्येमुळे गेल्या मार्चपासून बार्टीने एकही सामना खेळलेला नाही तसेच तिने दोन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. रूमानियाची सिमोना हॅलेप सध्या मानांकन क्रमवारीत दुसऱया स्थानावर आहे. पॅरीसमध्ये सध्या सुरू असलेल्या प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत पोलंडच्या स्वायटेकने चौथ्या फेरीत हॅलेपला पराभवाचा धक्का दिल्याने बार्टीचे चालू वर्षअखेरीस अग्रस्थान शाबूत राहणार आहे.