कोको गॉफ, बेन्सिक, स्वायटेक उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ ऍडलेड
अमेरिकेची युवा टेनिसपटू कोको गॉफने ऍडलेड इंटरनॅशनल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना सहाव्या मानांकित पेत्रा मॅटिकचा पराभव केला तर बिगरमानांकित अमेरिकेच्या डॅनियली कॉलिन्सने अग्रमानांकित व विद्यमान विजेत्या ऍश्ले बार्टीला पराभवाचा धक्का दिला.
16 वर्षीय गॉफने अमेरिकेच्या सहाव्या मानांकित पेत्रा मॅटिकचा 5-7, 6-3, 6-4 असा पराभव केला तर कॉलिन्सने बार्टीवर 6-3, 6-4 अशी सहज मात केली. बार्टीवर तिने मिळविलेला हा पहिलाच विजय आहे. शेल्बी रॉजर्सशी तिची पुढील लढत होईल. अन्य सामन्यात बेलिन्डा बेन्सिकने मिसाकी दोईचा 6-1, 6-3, ऍनास्तेसिया सेवास्तोव्हाने मॅकहेलचा 6-4, 6-1, शेल्बी रॉजर्सने तिसऱया मानांकित जोहाना कोन्टाचा 6-2, 6-2, प्रेंच ओपन विजेत्या इगा स्वायटेकने मॅडिसन इनग्लिसचा 6-1, 6-3, स्टॉर्म सँडर्सने युलिया पुतिनत्सेव्हाचा 6-4, 5-7, 6-1, स्विसच्या जिल टीचमनने चीनच्या आठव्या मानांकित वांग कियांगचा 3-6, 6-3, 6-3 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.