वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन
2022 च्या कॅरेबियन प्रिमियर लिग टी-20 स्पर्धेसाठी बार्बाडोस रॉयल्स संघाच्या नव्या प्रमुख प्रशिक्षकपदी ट्रेव्हर पेनीची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा या क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिली आहे. कॅरेबियन प्रिमियर लिग टी-20 स्पर्धेसाठी आता बार्बाडोस रॉयल संघाला पेनीच्या रुपात नवे प्रमुख प्रशिक्षक लाभत असून आता या क्लबचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा यांच्या समवेत पेनी संघाला मार्गदर्शन करणार आहेत. यापूर्वी संगकाराकडे प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 2022 च्या आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाच्या प्रँचायझीचे कुमार संगकारा हे साथीदार आहेत. ट्रेव्हर पेनी यापूर्वी इंग्लिश कौटी क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया वॉर्विकशायर क्लबचे प्रशिक्षक होते. तसेच या क्लबकडून त्यांनी 17 वर्षे प्रतिनिधीत्व केले आहे. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर पेनी यांनी आपल्या प्रशिक्षकाच्या कारकीर्दीत यापूर्वी भारत, लंका, इंग्लंड तसेच विंडीज संघाला मार्गदर्शन केले आहे. हॉलंड आणि अमेरिका संघांचे ते साहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. बार्बाडोस रॉयल्स क्लबने पेनी यांचे जोरदार स्वागत केले आहे.