प्रेमजी इन्वेस्टमेंटचा एशियन प्रायव्हेटसोबत करार- गुंतवणुकीसंदर्भात कोणताही खुलासा नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विप्रो कंपनीचे संस्थापक अझीम प्रेमजी आता रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानींच्या वाटेवर जात आहेत. अझीम प्रेमजी बेंगळूर येथील खेळण्याची निर्मिती करणारी कंपनी माय्रको प्लास्टिकमधील मोठी हिस्सेदारी खरेदी करण्याच्या तयारीत आहे. याकरीता प्रेमजी इन्वेस्टमेंटने एशियन प्रायव्हेट इक्विटी फंड अँड पार्टनर्ससोबत करार केला आहे. परंतु याबाबतच्या गुंतवणुकीसंदर्भात कोणताही खुलासा केलेला नाही.
मायक्रो प्लास्टिक्स एक कॉन्ट्रक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. जी अमेरिकेतील दोन प्रसिद्ध खेळण्यांची निर्मिती करणाऱया कंपन्यांमध्ये गणली जाते. अधिकाऱयांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार दोन इन्वेस्टर्सने मायक्रो प्लास्टिक्समध्ये महत्वपूर्ण हिस्सेदारी खरेदी केली आहे.
बार्बी डॉलचे उत्पादन
हास्ब्रो अमेरिकेतील एक खेळणी आणि बोर्डगेम तयार करणारी कंपनी आहे. खेळण्यांची निर्मिती करणाऱया जगातील सर्वात प्रसिद्ध बार्बी डॉल बाहूल्याचे उत्पादन सदरची कंपनी करते.
देशातील उत्पादन वाढीस चालना
प्रेमजी इन्वेस्टच्या प्रवक्त्यानी दिलेल्या माहितीनुसार सरकार खेळणी उत्पादनास चालना देण्यासोबत त्याचा विस्तारही वाढविणार असल्याची माहिती आहे. यासोबतच जागतिक बाजारपेठेत भारताच्या खेळण्यांकरीता बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न होणार आहे.
अंबानींनी घेतली ब्रिटनची खेळण्यांची कंपनी
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 2019 मध्ये खेळणी तयार करणारी कंपनी हॅमलेजची खरेदी केली आहे. हा व्यवहार 6.79 कोटी पौंडना (620 कोटी रुपये) झाला आहे. यातून रिलायन्सने खेळण्यांचे स्टोर सुरु करण्याची योजना आखल्याचीही माहिती आहे.