बार्शी / प्रतिनिधी
बार्शी तालुक्यातील सासुरे येथे अवैध वाळू उपसा करताना तीन लाख चौदा हजाराच्या मुद्देमालासह चार जणांना अटक करण्यात आली.
याबाबद अधिक माहिती अशी की, वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदि पात्रातुन कसलाही पास, परवाना किंवा रॉयल्टी न भरता मोठ्या प्रमाणात अवैध वाळु उपसा केला जात असल्याची गोपनिय माहिती सोलापुर पोलीस मुख्यालयाला मिळाली होती.त्यावरून नाईकनवरे, चव्हाण रंजीत मदने लक्ष्मण हेमाडे सतीश घुले कल्पना भोईटे या सोलापूर मुख्यालयातील विशेष पथकाने सासुरे गावच्या शिवारातील नदीपात्रात अचानक धाड घातली असता त्याठिकाणी समाधान साईनाथ सुतार राहणार सासुरे यांच्या मालकीच्या ४०७ या टेम्पोमध्ये दाऊद बापू शेख, दादा अब्बास शेख, रामचंद्र महादेव भगत, विष्णु तिपन्ना देवकर सर्व रा. सासुरे हे सर्वजण अवैध वाळु उपसा करताना पकडले असुन या सर्वा विरूद्ध गुन्हा नोंद करण्यात येवुन तिन लाख रुपये किमतीचा टेंपो व चौदा हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू जप्त करण्यात आलेले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड हे करत आहेत.