प्रतिनिधी / बार्शी
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कर्मवीर डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटल च्या नूतन प्रकल्प ट्रॉमा सेंटर व आयसीयु सेंटरसाठी सर्वतोपरी मदत करणार असून लवकरच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर सर्वप्रथम बार्शीला येणार असल्याचे खुद्द शरद पवार यांनी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने त्यांना भेटण्यास गेलेल्या पदाधिकारी व इतर मान्यवर यास सांगितले.
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध उपक्रमांसाठी शरद पवार यांनी भेट द्यावी यासाठी अनेक वर्षे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था प्रयत्न करत आहे. परंतु कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे शरद पवार शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे भेट देऊ शकत नव्हते मात्र आता कोरणा विषाणूंचा प्रादुर्भाव कमी होताच सर्वप्रथम बार्शीला येऊन शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व उपक्रमांना भेट देणार असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी व इतर यांनी शरद पवार यांना बार्शीत जगदाळे मामा हॉस्पिटल येथे अद्ययावत असे ट्रॉमा युनिट व आयसीयू सेंटर उभा करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगितले या कामासाठी अनेक प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक आणि संस्थांनी मदत केली असे सांगितले. नंतर शरद पवार यांनीही या कामासाठी यथावचित मदत करणार असल्याचे सांगितले.
तसेच कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बार्शीत येतो असे आश्वासन दिले. यावेळी भेटीत गेलेल्या मान्यवरांमध्ये सोलापूर जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे, मोहोळ चे आमदार यशवंत माने, संस्थेचे जनरल सेक्रेटरी जयवंत बापू शितोळे , शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश थोरात, सुप्रसिद्ध विधिज्ञ राहुल झालटे, शेंद्रीचे उपसरपंच महेश चव्हाण संस्थेचे सदस्य प्रकाश पाटील व इतर मान्यवर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
पवार भेटीत शितोळे कुटुंबाच्या आठवणी उजाळल्या
यावेळी बारामती या ठिकाणी झालेल्या बैठकीत बार्शीचे माजी आमदार शैलजा ताई शितोळे यांचे सुपुत्र जयवांर जयवंत बापू शितोळे उपस्थित होते. या वेळी यांनी शरद पवार यांनी शितोळे कुटुंबीय यांच्या जुन्या आठवणींनीना उजाळा दिला.