प्रतिनिधी / बार्शी
बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथील स्वस्त धान्य दुकान बाबत वारवार तक्रारी येत होत्या त्यातच या आठवड्यात तक्रारी वाढल्या असल्याने बार्शी पुरवठा निरीक्षक अभय साबळे यांनी या दुकानाची तपासणी करून आपला अहवाल आई येथील मंडळ अधिकारी यांनीही आपला अहवाल सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे पाठवला होत्या त्या बाबत आज हे दोन्ही अहवाल विचारात घेता सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी चिखर्डे गावचे स्वस्त धान्य दुकान निलंबित केले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, चिखर्डे या गावातील शिधा पत्रक धारक यांनी राशन दुकान दार गेली पाच वर्षा पासून धान्य कमी वितरीत करीत आहे , पावती दिली जात नाही , वजन काट्यात तफावत आहे, अश्या व अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या त्या नंतर पुरवठा निरीक्षक यांनी गाव भेट केली. या वेळी गाव कामगार तलाठी यांनी स्वस्त धान्य दुकान चालकास अन्न सुरक्षा रजिस्टर व ग्राहक यादी मागितली असता दिली नाही.
तसेच त्याच्या तपासणीत वरील आक्षेप व तक्रारी खऱ्या आढळल्या. त्यामुळे दि. १२ एप्रिल रोजी पुरवठा निरीक्षक यांनी आपला अहवाल सादर केला , तर मंडल अधिकारी यांनी १३ एप्रिल रोजी आपला आहवाल सादर केला होता. त्या प्रमाणे आज हे दुकान निलंबित केले असून हे दुकान येलंब या गावचं रेशन दुकानास जोडले असल्याचे आदेश पारित केले आहेत. कोरोनामुळे हातावर पोट असणारे यांची उपजीविका भागवण्याचा मोठा प्रश्न आज त्यांच्या समोर उभा आहे. त्यात असे स्वस्त धान्य दुकानाचे पराक्र समोर आले आहेत. आता प्रशासनाने तालुक्यातील प्रत्येक दुकान तपासणे आणि काही गैर कारभार आढळला तर कारवाई करणे गरजेचे बनले आहे.