प्रतिनिधी / बार्शी
बार्शी बायपास रोड वर गाताची वाडी या फाट्याजवळ जामगाव कडून येणारी लक्झरी बस आणि एका दुचाकीची सामोरा समोर धडक बसून अपघात काल दि . ९ मे रविवार रोजी सायंकाळी ८ चे सुमारास घडला यात दुचाकी स्वार हा जागीच मयत झाला असुन लक्झरी बस चा चालक हा फरार झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि. रविवार रात्री ८ चे सुमारास जामगाव कडून येणारी बार्शी बायपास वरून मार्गस्त होत असलेली लक्झरी बस क्रमाक एम एच २३ – डब्लू ५०२० ने बार्शीतील व्यंकटेश फिलामेंट या कारखान्यात रात्र पाळीची ड्युटी साठी निघालेले शिवाजी उंदरे यांना जोराची धडक दिली. यावेळी हि धडक एव्हडी भीषण होती कि शिवाजी उंदरे हे रस्त्याच्या बाजूला आपल्या गाडी सहित फेकले गेले. त्यात त्यांच्या डोक्यास आई पायास जोराचा मार लागला. त्याना उपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल केले असता ते उपचार पूर्वीच मयत झालेचे सांगितले. या वेळी हि लक्झरी बस दुचाकीला धडक देवून रस्त्यच्या कडेला असणाऱ्या पत्रा शेड मध्ये घुसली. अपघात नंतर बस चालक फरार झाला असून बस तशीच सोडून पळून गेला आहे. या बाबत मयत यांचे पुतणे राहुल उंदरे यांनी बार्शी तालुका पोलीस ठाणे फिर्याद दिली असून त्या चालका विरुद्ध भारतीय दंड विधान २७९ , ३०४ (अ ), ४२७ व मोटार वाहन कायदा १८४, १३४ अ, ब प्रमाणे गुन्हा दाखल केला असून याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.