वृत्तसंस्था/ कँप नोयु
शनिवारी येथे झालेल्या ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात बार्सिलोना क्लबने इलेची कलबचा 3-2 अशा गोलफरकाने निसटता पराभव करत पूर्ण गुण वसुल केले.
या सामन्यात 19 वर्षीय निको गोंझालेझचा गोल बार्सिलोनाचा निर्णायक ठरला. या सामन्यात बार्सिलोनाला 3 गुण मिळाले. या स्पर्धेतील गेल्या दोन सामन्यात बार्सिलोनाला विजय मिळविता आला नव्हता. बायर्न म्युनिचने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बार्सिलोनाचा 3-0 असा दणदणीत पराभव केला होता. शनिवारच्या सामन्यात बार्सिलोनाचा पहिला गोल हेडरद्वारे जाँगने नोंदविला. यानंतर चारच मिनिटाच्या कालावधीत बार्सिलोनाचा दुसरा गोल गेव्हीने केला. मध्यंतरापर्यंत बार्सिलोनाने 2-0 अशी आघाडी मिळविली होती. उत्तरार्धातील खेळाच्या केवळ दोन मिनिटाच्या कालावधीत मॉरेंटी आणि मिला यांनी इलेची क्लबतर्फे प्रत्येकी एक गोल नोंदविला. 85 व्या मिनिटाला बदली खेळाडू निको गोंझालेझने बार्सिलोनाचा तिसरा आणि निर्णायक केला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात बार्सिलोनाचा संघ सातव्या स्थानावर आहे. रियल माद्रीद पहिल्या स्थानावर आहे.