वृत्तसंस्था/ बार्सिलोना
अर्जेटिनाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू तसेच बार्सिलोना फुटबॉल क्लबचा कर्णधार लायोनेल मेसीला या क्लबच्या प्रशिक्षण शिबिरातून अलिप्त राहावे लागले. बार्सिलोना क्लबचे अध्यक्ष बार्टोमेयु यांच्या दडपणामुळे आपल्याला बार्सिलोनामध्येच राहावे लागले, अशी माहिती मेसीने दिली.
बार्सिलोना क्लबला मेसीला प्रशिक्षण शिबिरापासून अलिप्त ठेवण्यासाठी क्लबचे अध्यक्ष बार्टोमेयु यांचे प्रयत्न चालू होते. सदर माहिती फॅक्सद्वारे प्रसिद्ध करून या क्लबने खळबळ माजविली होती. त्यानंतर दहा दिवसांच्या कालावधीत या निर्णयामुळे मेसीवर चांगलेच दडपण आले होते. शुक्रवारी आपल्याला बार्सिलोनामध्येच राहण्याची सक्ती करण्यात आली होती, असे मेसीने म्हटले आहे. क्लबच्या प्रशिक्षण शिबिरापासून मेसीला अलिप्त ठेवण्यासाठी बार्टोमेयु यांनी आपला शब्द अखेर खरा केला. शनिवारी सकाळी सुरू झालेल्या बार्सिलोना क्लबच्या प्रशिक्षण शिबिरात जॉर्डी अल्बा आणि फिलीपी कुटिन्हो यांचा समावेश होता पण मेसीला प्रशिक्षण सरावाच्या ठिकाणी उपस्थित राहता आले नाही. गेल्या रविवारी बार्सिलोना क्लबच्या फुटबॉलपटूची कोरोना चांचणी घेण्यात आली पण मेसीला हेतूस्पर वगळण्यात आले होते. येत्या सोमवारी मेसीला आपली पहिली कोरोना चांचणी द्यावी लागेल. या चांचणीत तो निगेटिव्ह ठरला तर त्याचे बार्सिलोना संघात पुनरागमन होवू शकेल. दरम्यान बार्सिलोनाचा मित्रत्वाचा फुटबॉल सामना 12 सप्टेंबरला नेस्टिक क्लब बरोबर होणार आहे.