वृत्तसंस्था/ माद्रीद
रविवारी येथे झालेल्या सामन्यात मेसीच्या निर्णायक गोलाच्या जोरावर बार्सिलोना क्लबने रियल बेटीसचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. मेसीकडून लीग स्पर्धेत सर्वात जलद गोल नोंदविला गेला. या सामन्यात बदली खेळाडू म्हणून मैदानात प्रवेश केल्यानंतर 136 सेकंदात मेसीने बार्सिलोनाचा हा निर्णायक गोल केला.
गेल्या बुधवारी झालेल्या कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेच्या सेव्हिलाविरूद्धच्या उपांत्य सामन्यासाठी बार्सिलोना संघाने अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली होती. ला लीगा फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोना संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
रविवारच्या सामन्यात बेटीसचे खाते इग्लेसीसने उघडले. बेटीसचा दुसरा गोल नेडिल फकीरने केला. बार्सिलोनातर्फे ग्रिझमनने तसेच रूईझ व मेसी यांनी प्रत्येकी एक गोल केला. ला लीगा फुटबॉल स्पर्धेच्या गुणतक्त्यात ऍटलेटिको माद्रीद पहिल्या स्थानावर असून बार्सिलोना संघ माद्रीदपेक्षा सात गुणांनी पिछाडीवर आहे.