वकील व त्यांच्या कुटुंबियांनी घेतला लाभ
प्रतिनिधी/ बेळगाव
बार असोसिएशनच्यावतीने वकिलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करण्यात आले आहेत. आतापर्यंत तब्बल 9 वेळा लस उपलब्ध करुन देण्यात आली तर शनिवारी पुन्हा एकदा लस उपलब्ध करुन दुसरा डोस वकील व त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आला.
कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे सदस्य ऍड. विनय मांगलेकर, बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. गजानन पाटील, जनरल सेपेटरी ऍड. आर. सी. पाटील, जाईंट सेपेटरी ऍड. शिवपुत्र फटकळ यांच्यासह इतर सदस्यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत.
बेळगाव न्यायालयात काम करणाऱया वकिलांना व त्यांच्या कुटुंबियांना लस देण्यासाठी प्रथम प्राधान्य द्या, अशी मागणी या सर्वांनी प्रादेशिक आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार टप्प्याटप्प्याने लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऍड. विनय मांगलेकर व बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱयांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. या सर्वांना ज्ये÷ वकिलांचेही सहकार्य लाभले.
शनिवारी दुसरा डोस देण्यात आला. एकूण 300 जणांनी याचा लाभ घेतला. अत्यंत शिस्तबद्धरित्या लस देण्यात आली. लस घेणाऱयांचे आधारकार्ड घेऊन स्वतः कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे सदस्य ऍड. विनय मांगलेकर, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. गजानन पाटील, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, जाईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ यांनी नोंद करुन घेतली. त्यानंतर तातडीने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनी लस दिली. यावेळी ऍड. अमृत कोल्हटकर यांच्यासह इतर वकिलांनी देखील सहकार्य केले.