मलिकवाड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम
वार्ताहर/ मलिकवाड
कर्नाटक सरकारच्या महिला व बालविकास खात्याच्यावतीने बालविवाह मुक्त कर्नाटक जागृती मोहीम राबविण्यात येत असून मलिकवाड येथे शुक्रवारी सरकारी शाळा पटांगणात या मोहिमेचा ग्रामपंचायत अध्यक्ष पुंडलिक खोत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील यांनी मलिकवाड येथे आजपर्यंत बालविवाहाची घटना घडलेली नाही. यापुढेही घडणार नाही. यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व नागरिक दक्ष राहतील. पण शासनाने बालविवाहाचे मुलीचे वय 21 व मुलाचे वय 25 करण्याबाबत विचार चालविला असून हा निर्णय मागे घेण्यात यावा. अलिकडे माणसाचे आयुष्य घटत चालले असून विवाहाचे वय वाढविल्यास त्या कुटुंबाचे नुकसान होणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील यांनी, बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. बालविवाह करणाऱयांना दंड व कारावासाची शिक्षा असून मलिकवाड येथे असे प्रकार अद्याप घडलेले नाहीत. यापुढेही असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी दक्षता घेण्यात येणार असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतीच्या माजी अध्यक्षा चांदबी नदाफ यांनी बोलताना मुलांची मानसिक व शारीरिक वाढ पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा विवाह करणे अयोग्य आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील ज्ये÷ नागरिकांनी मुलांच्या आरोग्यासाठी बालविवाह टाळावा, असे आवाहन केले.
निपाणी येथील महिला व बालविकास खात्याच्या अधिकारी सुमित्रा डी. बी. यांनी बोलताना महिनाभर बालविवाह मुक्त कर्नाटक मोहीम राबविण्यात येत असून विभागनिहाय निवडक गावात जागृती करण्यात येत आहे. बालविवाह रोखण्यात लोकप्रतिनिधींचे पात्र महत्त्वाचे आहे. बालविवाहाची घटना आढळून आल्यास मुला मुलीचे माता-पिता व मुलाला आरोपी ठरविले जाते. तसेच विवाह लावून देणाऱया पौरोहित्यावरही गुन्हा नोंदविला जातो. वर्षभरात निपाणी तालुक्मयात 20 बालविवाहाची प्रकरणे रोखण्यात आली आहेत. सर्व समाजाने बालविवाह मुक्त कर्नाटकसाठी हातभार लावावा, असे आवाहन केले.
ग्रामपंचायत अध्यक्ष पुंडलिक खोत यांच्या हस्ते बालविवाह विरोधातील जागृती व्हिडीओचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामपंचायत उपाध्यक्षा अनिता इंगळे, शमा जमादार, अनिता लक्कोळे, लक्ष्मी नडवीनमनी, निवास करजगे, मल्लिकार्जुन कांबळे, विकास अधिकारी केंचन्नवर, अंगणवाडी कार्यकर्त्या लक्ष्मी शिंदे, महादेवी कानडे, रेखा सनदी, सुलोचना कट्टीकर, संगीता नडोनी, हमीदा मुल्ला, सुवर्णा केरुरे यांच्यासह आशा कार्यकर्त्या तसेच परिसरातील महिला संघाच्या सदस्या उपस्थित होत्या..