प्रतिनिधी/ बेळगाव
टिळकवाडी येथील बालिका आदर्श विद्यालयात मंगळवारी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मंजुनाथ गोल्लीहळ्ळी यांनी सर्वांचे स्वागत केले. एकनाथ पाटील व वंदना कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
हिंदू संस्कृती आणि परंपरेची माहिती स्वामी विवेकानंदांनी जगासमोर आणली. त्यांच्या पुस्तकांचे वाचन करून आजचा युवा दिन साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी म्हणाले, जिजाऊ या आदर्श माता होत्या. त्यामुळेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले. आजची युवापिढी घडविण्यासाठी प्रत्येक मातेने जिजाऊंचा आदर्श घेणे गरजेचे आहे, असे सांगितले. जिजा शहापूरकर व वेदिका खन्नूकर यांनी मनोगत व्यक्त केले. विजय पार्लेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.