20 वर्ष शिक्षेसह 10 हजार रूपये दंड
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे 8 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करणाऱया नराधमाला न्यायालयाने 20 वर्ष सश्रम कारावास व 10 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावल़ी विकास विठ्ठल पवार (35, मेर्वी- रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आह़े शहराच्या मुख्य भागात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होत़ा न्यायालयाकडून पीडितेला न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आह़े
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जून 2019 मध्ये आपली आई व सावत्र वडिलांसोबत रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आली होत़ी तिच्यासोबत तिचा 6 वर्षाचा भाऊ व 4 वर्षाची बहीणही होत़ी दरम्यान पीडित मुलीचे आई व वडील या मुलांना रेल्वेस्टेशनवरच सोडून आपल्या गावी गेल़े त्यामुळे ही मुले भिक मागून आपले पोट भरत होती.
16 जून 2019 रोजी ही मुले चालून दमल्याने रात्री झोपण्यासाठी शहरातील शिवाजी स्टेडियम येथे गेली. स्टेडियममधील प्रेक्षक गॅलरीत ही मुले झोपलेली असताना आरोपी विकास पवार त्या ठिकाणी दारू पिण्यासाठी गेला होता. तेव्हा विकास याची नजर या मुलांवर पडल़ी रात्री उशिरा विकासने 8 वर्षीय चिमुरडीवर अतिप्रसंग केल़ा ही बाब त्या परिसरात असलेल्या एका महिलेच्या निदर्शनास आली. तिने या विषयीची खबर तत्काळ शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी काही वेळातच घटनास्थळी पोहोचत विकास पवारला ताब्यात घेतले होते. त्याच्यावर भा.दं.वि.क. 376, बाल लैगिंक अत्याचार संरक्षण कायदा 2012 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधीकारी गणेश इंगळे यांनी केला व न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवण्यात आले होत़े खटल्यादरम्यान एकूण 16 साक्षीदार तपासण्यात आल़े पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश व्ह़ी ए. राऊत यांनी आरोपी पवार याला दोषी मानून शिक्षा ठोठावल़ी सरकारी पक्षाच्यावतीने ऍड. मेघना नलावडे व ऍड. अनिरूद्ध फणसेकर यांनी काम पाहिल़े पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल सोनाली शिंदे यानी काम पाहिल़े