प्रतिनिधी / बेळगाव
कपिलेश्वर रोड येथील बाल शिवाजी युवक मंडळाच्यावतीने संपूर्ण भागाचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. मंडळाच्या आपली गल्ली आपली जबाबदारी या उपक्रमांतर्गत औषध फवारणी करण्यात आली. कपिलेश्वर रोड, रामा मेस्त्री अड्डा, रेल्वे गेट या परिसरात औषध फवारणी करण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर देसाई, राकेश पोटे, विजय चव्हाण, मोहन हंगीरगेकर, चिंतामणी माने, विनायक अनगोळकर, महेश रायचुरकर यासह कार्यकर्ते उपस्थित होते.