डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची चार दिवसानी प्रक्रिया सुरू
वारणानगर / प्रतिनिधी
बच्चे सावर्डे ता. पन्हाळा येथील सचिन विश्वनाथ बच्चे या सीमा सुरक्षा दलात कलकत्ता येथे कार्यरत असणाऱ्या जवानाच्या पत्नीचा बाळंत पणातील उपचारा अभावी सोमवार दि. १७ रोजी पहाटे मृत्यू झाला. पूजा सचिन बच्चे असे मृत्यू झालेल्या मातेचे नांव असून उपचार नाकारणाऱ्या डॉक्टर विरूध्द चार दिवसानी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
जवान सचिन बच्चे यांच्या पत्नी पूजा या गरोधर राहिल्या पासून वारणानगर येथील एका हॉस्पीटल येथे नियमीत तपासणी व उपचार घेत होत्या तेथील डॉक्टरानी बाळतपणाच्या वेदना सुरु झालेवर पूजा यांना हॉस्पीटल मध्ये येण्यास सांगीतले होते त्याप्रमाणे रविवार दि. १६ रोजी रात्री एक वाजता वेदना जाणवू लागल्यावर हॉस्पीटल च्या दारात पोहचल्यावर गेटचे दार उघडले नाही विनंती केल्यावर खिडकीतूनच त्यांना दुसऱ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला.
कोडोलीतील पहाटे पर्यन्त अन्य चार हॉस्पीटलला विनंती केली तथापी त्यानी देखील असमर्थता दर्शवली अखेर कोल्हापूरात डॉ. डि.वाय. पाटील हॉस्पीटल येथे नेत असता पहाटे ४ वा. पूजा यांचा वाटेतच मृत्यू झाला.
देशसेवेत काम करणाऱ्या जवानाची पत्नी उपचारा अभावी मृत्यू होते गेली दोन दिवस उपचार नाकारणाऱ्या डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यास कोडोली पोलीस ठाण्यात हेलपाटे मारले अखेर सुरक्षा दलाच्या वरिष्ठानी आदेश काढल्यावर गुन्हा दाखल कराय चालू आहे असे जवान सचिन बच्चे यानी सांगीतले.