प्रतिनिधी / बेळगाव
केबल दुरुस्तीचे काम करताना विद्युत वाहिनीचा धक्का लागल्याने कर्मचारी जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास बाळकृष्णनगर, वडगाव येथे घडली. स्थानिकांनी त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बाळकृष्णनगर भागातून उच्च दाबाची विद्युत वाहिनी उद्यमबागला जोडण्यात आली आहे. केबल दुरुस्तीचे काम करताना कर्मचारी जखमी झाला. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ वाहनातून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. लॉकडाऊनमुळे सर्वजण घरीच असल्याने तात्काळ मदत मिळाली. मात्र यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती.