ऑनलाईन टीम / विशाखापट्टणम :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. अशातच एक प्रेरणादायक घटना समोर आली आहे.
आंध्र प्रदेशतील विशाखापट्टणम येथील महापालिका आयुक्त सृजन गुमाला या बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या 22 दिवसातच कामावर परत रुजू झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महिन्याभरापूर्वी सृजना यांनी मुलाला जन्म दिला. मात्र कोरोना लढ्यासाठी लगेचच लॉक डाऊन जाहीर करण्यात आले. मात्र महापालिकेला त्यांची गरज होती. त्यावेळी सृजना यांनी कोणताही विचार न करता लगेचच कामावर रुजू झाल्या. यासाठी त्यांच्या घरच्यांची खूप मदत मिळाली.
याबद्दल बोलताना सृजना म्हणाल्या, मी या अशा परिस्थितीत कामावर असणे गरजेचे होते. मला माझी जबाबदारी माहीत आहे. त्यामुळे मी कामावर रुजू झाले आहे. तसेच कामावर आल्यानंतर मी दर चार तासांनी घरी जाऊन माझ्या मुलाला दूध पाजते आणि परत येते. या काळात माझे पती, माझ्या सासू मुलाला सांभाळतात, असं ही त्यांनी यावेळी सांगितले.