काकती पोलीस स्थानकात एफआयआर
बाळेकुंद्री के.एच. येथील गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी तिच्या कुटुंबियांनी सोमवारी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
प्रमिळा मोहन कांबळे (वय 65) असे त्या वृध्देचे नाव आहे. प्रमिळा या आंबेवाडीला आल्या होत्या. 8 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजता बाळेकुंद्री के. एच.ला जाण्याचे सांगून त्या आंबेवाडी येथून बाहेर पडल्या. त्या अद्याप घरी परतल्या नाहित.
यासंबंधी आंबेवाडी येथील राधा यल्लाप्पा कांबळे यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस त्या वृध्देचा शोध घेत आहेत. 5 फूट उंची, अंगाने साधारण, गोल चेहरा, काळसर वर्ण असे त्या वृध्देचे वर्णन आहे. घराबाहेर पडताना तिने आपल्या अंगावर चॉकलेटी साडी परिधान केली होती. वरील वर्णनाच्या वृध्दे विषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405203 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.