बाळेपुंद्री : बाळेपुंद्री खुर्द ग्राम पंचायतीच्या नूतन सदस्यांचा सत्कार लक्ष्मी गल्ली येथील लक्ष्मी मंदिरात मंगळवारी झाला. ग्रा. पं. वॉर्ड क्र. 2 मधील सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार लक्ष्मी देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आला. सकाळी देवीची आरती झाल्यानंतर नूतन सदस्या नम्रता प्रशांत जाधव, रेणुका मल्लिकार्जुन करविनकोप्प, सदस्य संजय बळवंत पाटील व प्रवीण बसवाणी मुरारी यांचा देवस्थान कमिटीचे दशरथ चौबारी, शिक्षक भरत कडोलकर, परशराम चंदगडकर, बाहुबली जक्कन्नावर, निलाक्का चिक्कनगौडर, शितल कम्मार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी यशवंतराव जाधव म्हणाले, नूतन ग्रा. पं. सदस्यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची भूमिका महत्त्वाची आहे. उपस्थित मान्यवरांचे स्वागत भरत कडोलकर यांनी केले. शशिकला अनंतराव जाधव, शिवराज जाधव, काशीनाथ सुतार, शिवानंद श्याम कन्नेकर, पप्पू कम्मार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.