बाळे कुंद्री / वार्ताहर
बाळेकुंद्री खुर्द परिसरातील मोदगा, सुळेभावी, मारिहाळ, तुम्मरगुद्यी, हुदली व करडीगुद्यी भागातील शेतकरी भात मळणी, ऊस तोडणी कामात मग्न असतानाच अवकाळी पावसाने पुन्हा या भागात गुरुवारी रात्री तुरळक पावसाच्या सरी तर कांही ठिकाणी मोठा पाऊस झाल्याने पेरणी, मळणीच्या ऐन हंगामात पावसाचा अडसर निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने पावसाचा शिडकावा होणार असा अंदाच शेतकरी बाळगून होते. गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास तुरळक प्रमाणात हलक्या सरी कोसळण्यास प्रारंभ झाला .त्यामुळे कडधान्य हंगामातील वाटाणा, गहू, मसूर, जोंधळा आदी पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून बाळेपुंद्री, मारिहाळ, हुदली, हालगा, हिरेबागेवाडी आदी भागातील शेतकऱयांनी भात मळणी, ऊस तोडणीला जोरदार सुरूवात केली होती. परंतु गुरुवारी ऐन हिवाळय़ात बाळेपुंद्री भागात तुरळक तर कांही भागात जोरदार पावसाचा शिडकावा झाल्याने कडधान्य पिके धोक्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.