कलर्सने बावरा दिल या नव्या शोच्या प्रोमो लाँचसह प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. प्रोमोमध्ये दर्शवण्यात आले आहे की शिवा व सिध्दी एकमेकांवर चिखलफेक करत आहेत, पण आक्काबाईंच्या सामर्थ्यामुळे आणि प्रभावामुळे भविष्यात त्यांच्या जीवनावर काय परिणाम होणार आहेत याची त्यांना कल्पना नाही.
टेलिव्हिजन वरील प्रसिध्द समुखी पेंडसे सामर्थ्यशाली पात्र चंद्रकांता देशमाने उर्फ आक्काबाईची भूमिका करणार आहे. आक्काबाई महाराष्ट्रातील रुद्रायत गावातील राजकीय नेता आहे आणि गावाच्या राजकीय इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. एका 26 वर्षांच्या शिवा लष्करे या मुलामुळे हे सर्व घडले. बावरा दिल मध्ये आक्काबाईची भूमिका साकारणाऱया समुखी पेंडसे म्हणाल्या, “तुम्ही जसा विचार करता तसेच बनता असे म्हटले जाते आणि अशीच कथा आहे आक्काबाईची. जेव्हा आकाक्बाईच्या पात्रासाठी मला विचारण्यात आले तेव्हा मला असे वाटले की एक अभिनेत्री म्हणून मला जे हरवल्यासारखे वाटत होते ते मला मिळाले आहे. ही संधी मला दिली यासाठी मी कलर्सचा अत्यंत आभारी आहे. आक्काबाईच्या पात्राला अनेक छटा आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन मिळणार आहे कारण माझ्या पात्राच्या अनेक छटा उलगडताना त्यांना पहायला मिळणार आहेत. मी खूपच उत्सुक आहे आणि मला आशा आहे की आक्काबाई टेलिव्हिजनच्या इतिहासात माझ्या प्रेक्षकांचे प्रेम व पाठिंब्याने आदर्श पात्र बनेल.