वार्ताहर / कुंभोज
बाहुबली मध्ये आचार्य १०८ श्री धर्मानंदसागर महाराज यांचा पिंछी परिवर्तन समारोह उत्साहात संपन्न झाले, पिंछी परिवर्तनचा मान अथणीच्या चिप्परगे कुटुंबियांना मिळाला. यावेळी मुनी १०८ श्री अपूर्वसागर महाराज, मुनी १०८ श्री अर्पितसागर महाराज, मुनी १०८ श्री क्षेमसागर महाराज, मुनी १०८ श्री देवधरसागर महाराज, आर्यिका १०५ श्री ज्ञानमती माताजी, आर्यिका १०५ श्री चेतनामती माताजी, आर्यिका १०५ श्री विमुक्तमती माताजी हे त्यागीगण उपस्थित होते.
यावेळी धर्मानंदसागर महाराजांच्या जीवनावरील महत्वाच्या घटनांच्या फलकाचे अनावरण व जिनवाणी ग्रंथ विमोचन बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ चे संचालक गोमटेश बेडगे, बालविकासचे चेअरमन तात्यासो अथणे, अधिक्षक ए. ए. खाडे, उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई, अरूण चौगुले, रवींद्र देसाई, बाबगौंडा पाटील, एस. एन. पाटील यांनी करून त्यागींचे पादपूजन, अर्घ्यावली करून ग्रंथभेट दिले. यावेळी संघस्थ दीदी व संस्थेतील कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. त्यागींचे आशीर्वचन होऊन जिनवाणी स्तुतीने कार्यक्रम संपन्न झाले. स्वागत व प्रास्ताविक संचालक गोमटेश बेडगे यांनी केले. तर सूत्रसंचालन स्नेहल पाटील व स्मिता निटवे यांनी केले.