नोव्हेंबरमध्ये सुरू होणार चित्रपट
‘बाहुबली-बिफोर द बिगिनिंग’ या वेबसीरिजचे चित्रिकरण नोव्हेंबर महिन्यापासून दक्षिण भारतात सुरू होईल. सीरिजचे निर्माते चालू महिन्याच्या अखेरीस केरळ आणि कर्नाटकमध्ये चित्रिकरण स्थळांचा शोध घेणार आहेत. प्रामुख्याने वनक्षेत्रांची निवड करण्यात येणार आहे.
अभिनेत्री वामिका गब्बीला शिवगामीच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले आहे. या शोमध्ये दक्षिणेतील सुपरस्टार नयनतारा देखील स्वतःचे डिजिटल पदार्पण करणार आहे. शाहरुख खानसोबतच्या स्वतःच्या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केल्यावर नयनतारा शोच्या युनिटमध्ये सामील होणार आहे.
सिद्धार्थ तिवारी यांच्या स्वस्तिक प्रॉडक्शनकडून याची निर्मिती होणार असून रिभु दासगुप्ता आणि कुणाल देशमुख दिग्दर्शन करणार आहेत. बाहुबलीच्या दोन्ही चित्रपटांसाठी हिंदी संवादलेखन करणारे लेखक-गीतकार मनोज मुंतशिर या नव्या टीममध्ये सामील नसतील.