मुंबई : भारतातील प्रमुख रिटेल विक्रेते बिग बझार यांनी आपला पब्लिक हॉलिडे सेल सुरू केला आहे. दि. 22 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत हा सेल आहे. 2500 रुपयांच्या खरेदीवर 500 रु. ची सूट मिळणार आहे. इन स्टोअर आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाईन ग्राहकांना दोन तासामध्ये घरपोच सेवा मिळणार आहे.
या पब्लिक हॉलिडे सेलमध्ये खाद्य, फॅशन, होम आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या उत्पादनांवर मोठी सूट मिळणार असून ग्राहकांची खूप बचत होणार आहे. या योजनेमध्ये तूरडाळ 89 रु. किलो, टाटा टी वर 142 रु. बचत, लोशन आणि डिओवर एकावर एक फ्री अशा अनेक योजना ग्राहकाभिमुख आहेत.
वर्षाअखेरीच्या सणासाठी आमची सर्व आस्थापने सर्व वस्तूंनी खचाखच भरली आहेत. अत्यंत रास्त भावामध्ये भरपूर खरेदी करा आणि सुटीचा आनंद लुटा, असे आवाहन कंपनीचे सीएमओ पवन सारडा यांनी केले आहे.